२८ वर्षांत एवढे बदलले ‘हम आपके है कौन’चे कलाकार, काहींना ओळखणंही कठीण, काहींनी घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 10:16 PM2022-08-05T22:16:01+5:302022-08-05T22:23:42+5:30

Hum Aapke Hai Kaun: बॉलिवूडमधील सर्वात सुपरहीट चित्रपटांपैकी एक म्हणून हम आपके है कौन? या चित्रपटाचं नाव घेतलं जातं. या चित्रपटाने २८ वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्त जाणून घेऊयात की या चित्रपटातील कलाकार या काळात किती बदललेत, त्याविषयी.

बॉलिवूडमधील सर्वात सुपरहीट चित्रपटांपैकी एक म्हणून हम आपके है कौन? या चित्रपटाचं नाव घेतलं जातं. या चित्रपटाने २८ वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्त जाणून घेऊयात की या चित्रपटातील कलाकार या काळात किती बदललेत, त्याविषयी.

हम आपके है कौन चित्रपटात प्रेम बनून सर्वांचं प्रेम मिळवणारा सलमान आता बॉलिवूडमधील दबंग स्टार बनला आहे. सलमान किती बदललाय हे कुणाला सांगण्याची गरज नाही.

या सुपरहिट चित्रपटामध्ये माधुरीने निशाची भूमिका केली होती. तेव्हापासून आतापर्यंत माधुरीने चित्रपटसृष्टीत मोठा पल्ला गाठला आहे. एवढ्या वर्षांमध्ये जर काही बदललं नसेल ते आहे माधुरीचं हास्य

हम आपके है कौन मध्ये राकेशची भूमिका करताना मोहनीश बहलने आपल्या अभिनयाने सर्वांचं मन जिंकलं होतं. आजही मोहनीशच्या चेहऱ्यावर तीच निरागसता आहे जी त्याकाळी होती.

या चित्रपटात रेणुका शहाणेने पूजाची भूमिका केली होती. गेल्या २८ वर्षांच्या काळात रेणुकाची लोकप्रियता कायम आहे.

टीव्हीवर बापूजी म्हणून प्रसिद्ध झालेल्या अलोक नाथ यांनी हम आपके है कौन या चित्रपटात कैलाशनाथ यांची भूमिका केली होती. अलोक नाथ किती बदलले आहेत आणि किती नाहीत यातील फरक तुम्ही फोटो पाहून समजू शकता.

या चित्रपटात जर कुणी सर्वाधिक बदललं असेल तर ती म्हणजे प्रेमच्या प्रेमात असलेली रीटा. रीटाची भूमिका साहिला चड्डा हिने केली होती. ती आता एवढी बदलली आहे की, त्यांना ओळखणं कठीण बनलं आहे.

प्राध्यापक सिद्धार्थ चौधरी यांची भूमिका अनुपम खेर यांनी केली होती. गेल्या २८ वर्षांत ते बॉलिवूडमधील प्रमुख कलाकारांपैकी एक बनले आहेत.

या चित्रपटात काम करणाऱ्या बिंदू यांच्या रूपातही खूप बदल झाला आहे.

या २८ वर्षांत चित्रपटामधी काही कलाकार आता या जगात राहिलेले नाहीत. रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अजित वच्छानी यांच्यासारखे महान कलाकार आता आमच्यात राहिलेले नाही.

रीमा लागू यांनी चित्रपटांमध्ये अशी प्रतिमा निर्माण केली होती की, त्यांना लोक सलमान खानची आई म्हणून ओळखू लागले होते.