"२१ वर्षांपूर्वीची ती २१ मिनिटांची भेट...", श्रेयस तळपदेची लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नी दीप्तीसाठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:03 IST2025-12-31T15:57:39+5:302025-12-31T16:03:15+5:30
Shreyas Talpade And Dipti Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दीप्ती यांच्या लग्नाचा आज २१वा वाढदिवस आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता श्रेयस तळपदे सध्या त्याच्या एका खास सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. श्रेयस आणि त्याची पत्नी दीप्ती तळपदे यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे.

या खास दिनाचे औचित्य साधून श्रेयसने आपल्या लाडक्या पत्नीसाठी एक अतिशय रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या इंटरनेटवर चांगलीच व्हायरल होत आहे.

श्रेयसने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पत्नीसोबतचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "२१ वर्षांपूर्वी, मी तुला फक्त २१ मिनिटांसाठी भेटलो होतो आणि त्याच क्षणी मी तुझ्या प्रेमात वेडा झालो होतो. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दीप्ती!"

"तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही.", असे त्याने पुढे पोस्टमध्ये म्हटले.

श्रेयसने पुढे दीप्तीच्या त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा उल्लेख केला आहे. त्याने लिहिले की, "एक सुंदर मैत्रीण, एक अप्रतिम पत्नी, आपल्या मुलांसाठी एक सर्वोत्तम आई आणि माझी सर्वात जवळची मैत्रीण असल्याबद्दल तुझे मनापासून आभार."

श्रेयस आणि दीप्तीची जोडी मराठी सिनेसृष्टीतील सर्वात आदर्श जोड्यांपैकी एक मानली जाते. कठीण काळात, विशेषतः श्रेयसच्या आरोग्याच्या समस्यांच्या वेळी, दीप्ती त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती, ज्याचे कौतुक चाहत्यांनी अनेकदा केले आहे.

श्रेयसच्या या पोस्टवर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत.

चाहत्यांनीही "मेड फॉर इच अदर" अशा कमेंट्स करत त्यांच्यातील प्रेमाचे कौतुक केले आहे.

१ डिसेंबर २००४ मध्ये श्रेयस तळपदे-दिप्ती लग्नबंधनात अडकले.

श्रेयस तळपदे मराठी आणि हिंदी दोन्ही इंडस्ट्रीत तग धरुन आहे. दोन्हीतही त्याचं वेगळं स्थान आहे.

लवकरच तो 'वेलकम टू जंगल' या सिनेमातही दिसणार आहे. यामध्ये अक्षय कुमारसह बॉलिवूडमधील इतर बरीच स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
















