लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 14:08 IST2025-06-14T14:03:32+5:302025-06-14T14:08:44+5:30
सुशांतला जाऊन ५ वर्ष झाली तरी त्याच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम आहे.

१४ जून २०२०...बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने संपूर्ण सिनेसृष्टी हादरून गेली तर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
मुंबईतील वांद्रे येथील फ्लॅटमध्ये सुशांतचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. आज त्याच्या मृत्यूला ५ वर्ष पूर्ण होत आहेत.
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. सुशांतला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप रियावर करण्यात आला होता.
सुशांत हा एक हरहुन्नरी अभिनेता होता. अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व असलेला सुशांत आत्महत्या करू शकत नाही, त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
लॉकडाऊनमुळे डिप्रेशनमध्ये जाऊन सुशांतने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं गेलं.
सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अनेकांची नावं समोर आली होती. मात्र त्याने आत्महत्या केली की हत्या, याबाबत अजूनही तपास सुरू आहे.
सुशांतला जाऊन ५ वर्ष झाली तरी त्याच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम आहे.
पवित्र रिश्ता मालिकेतून सुशांतने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर त्याने थेट बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती.
'काय पो चे', 'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'छिछोरे', 'केदारनाथ', 'पीके' यांसारख्या सिनेमात तो दिसला. 'दिल बेचारा' हा सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरला.