बॉलिवूडची लेडी अंबानी आहे सुनील शेट्टीची पत्नी; एकटी सांभाळते करोडोंचे बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 15:21 IST2022-03-11T15:15:45+5:302022-03-11T15:21:06+5:30

Suniel shettys wife: सुनील शेट्टी आणि त्याची बायको वर्षाला कोटयवधींची कमाई करतात.

बॉलिवूड कलाकार कायमच त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइमुळेही चर्चेत येत असतात. यात खासकरुन त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि संपत्तीची चर्चा होते. सध्या अशीच चर्चा अभिनेता सुनील शेट्टीच्या पत्नीची होत आहे.

आपल्या अभिनयामुळे सुनील शेट्टीने गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र, आता त्याचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे.

सुनील शेट्टीचा कलाविश्वातील वावर जरी कमी झाला असला तरीदेखील तो अन्य क्षेत्रांमध्ये सक्रीय आहे. इतकंच नाही तर त्याची पत्नी प्रत्येक टप्प्यावर त्याला साथ देत आहे.

सुनील शेट्टीच्या पत्नीचं नाव माना शेट्टी असं असून तिला बॉलिवूडमधील लेडी अंबानी म्हटलं जातं.

माना बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत स्त्री म्हणून ओळखली जाते.

माना एक बिझनेस वूमन असून तिने कलाविश्वात तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे घर आणि व्यवसाय या दोघांचा ती बरोबर समतोल राखते.

माना आणि सुनील शेट्टी यांनी मिळून S2 हा रिअल इस्टेट प्रोजेक्ट सुरु केला होता. या प्रोजेक्ट अंतर्गत त्यांनी मुंबईत २१ लक्झरी विला उभारले आहेत.

मानाचं एक लाइफस्टाइल स्टोरदेखील आहे. यात डेकोरेशनपासून ते दैनंदिन जीवनात लागणाऱ्या काही लक्झरी वस्तूही सहज उपलब्ध होतात.

माना 'सेव द चिल्ड्रन इंडिया' ही एनजीओदेखील चालवते. तसंच सुनील शेट्टीचं एक प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. त्यामुळे ही नवरा-बायकोची जोडी वर्षाला कोटयवधींची कमाई करतात.