Casting Couch : ‘चित्रपटात भुमिका मिळेल, पण थोडी तडजोड करावी लागेल…’, अभिनेत्रीने केलाय वाईट प्रसंगांचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 06:20 PM2024-05-14T18:20:42+5:302024-05-14T18:36:45+5:30

अभिनेत्री सुचित्रा पिल्लई (Suchitra pillai) हिनं ९० च्या काळात प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: राज्य केलं होतं.

आता सुचित्रा पिल्लई सध्या 'ब्रोकन न्यूज 2' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुचित्रा तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. यावेळी तिनं कास्टिंग काउचवर भाष्य केलं.

झगमगत्या विश्वातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कास्टिंग काउच (Casting Couch). पूर्वी अभिनेत्री त्याच्यासोबत घडणाऱ्या प्रसंगाचा खुलासा करत नव्हते. पण आता अभिनेत्री यावर मोकळेपणाने भाष्य करतात.

चित्रपटसृष्टी बाहेरून जितकी चकचकीत दिसते, तितकीच ती आतून पोकळ असते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. बहुतेक अभिनेत्रींना इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी या समस्यांचा सामना करावा लागतो, ज्यामध्ये कास्टिंग काउच ही एक सामान्य समस्या बनली आहे. अभिनेत्री सुचित्राला सुद्धा या गोष्टीचा सामना करावा लागला होता.

एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने कास्टिंग काउचपासून स्वतःला कसे वाचवलं, हे सांगितले.

सुचित्रा म्हणाली, 'कधीकधी तुम्हाला खूप संधी मिळतात, पण काही जण कास्टिंग काउचचे शिकार होतात. प्रत्येकाला कधी ना कधी याचा सामना करावा लागतो'.

सुचित्रानं सांगितलं की, खुप वर्षांपुर्वी तिला एक फोन आला होता. तेव्हा त्यांनी तिला साऊथच्या सिनेमात भुमिका ऑफर केली होती.

सुचित्रानं सांगितलं की, 'बऱ्याच वर्षांपूर्वी मला एक फोन आला आणि कॉलरने विचारले की 'साऊथच्या चित्रपटात काम करायचं आहे का?' यावर मी 'हो' अस उत्तर दिलं. यानंतर ती व्यक्ती म्हणाली, 'एक चित्रपट आहे, ज्यामध्ये खूप मोठे कलाकार काम करत आहेत आणि चित्रपटाचे दिग्दर्शनही मोठे दिग्दर्शक करत आहेत. तुला अभिनेत्याच्या बहिणीची भूमिका मिळेल'. हे ऐकूण मी आनंदी झाले. पण हा आनंद काही क्षणासाठीच होता.

सुचित्रा पुढे म्हणाली, फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने पुढे म्हटलं, 'या चित्रपटात एक नवीन निर्माता आपले पैसे गुंतवत आहे. म्हणून मला वाटलं की ती कमी फी देतील. पण, पण तो माणूस पुढे म्हणाला, 'तुम्हाला थोडी तडजोड करावी लागेल'. यावर मी त्यांना तसे करण्यास स्पष्टपणे नकार दिला.