सोनम कपूरला या कारणामुळे केले जातेय सोशल मीडियावर ट्रोल, तिच्या एका प्रश्नावर दिली नेटिझन्सने भन्नाट उत्तरं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 19:33 IST2020-05-14T19:33:12+5:302020-05-14T19:33:12+5:30

सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने सामान्यांसोबतच सेलिब्रेटी देखीली आपापल्या घरात असून आपल्या कुटुंबियांसोबत ते वेळ घालवत आहेत.
अनेल सेलिब्रेटी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत.
सोनम कपूर देखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
या फोटोंसोबतच देवा... मी काय करू अशी कॅप्शन सोनमने दिली आहे.
सोनमच्या या फोटो आणि कॅप्शनमुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे.
नेटिझन्स सोनमच्या या कमेंटवर भन्नाट रिप्लाय देत आहेत. काहींनी सोनमला पैसे दान करण्याचा सल्ला दिला आहे तर काहींनी तर चक्क अभिनय सोड असा सल्ला तिला दिला आहे.
सोनमला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात असले तरी तिने अद्याप यावर काहीच रिप्लाय दिलेला नाहीये.
सोनम आता यावर काही रिप्लाय देते का याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.