ये तो स्टाइल हैं बॉस! सोनम कपूरचा क्लासी बॉसी लूक, see photos

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 05:31 PM2024-05-16T17:31:04+5:302024-05-16T17:52:12+5:30

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनम तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे.

सोनम कपूर ही गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. सोनम कपूर ही सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते.

आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनम कपूर ही दिसते. तिच्या फोटोमुळे सध्या सोनम कपूर ही चर्चेत आलीये.

फॅशनला नवी व्याख्या देणारी सोनम अनेकदा तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते. असाच एक लूक तिनं आता केलाय.

सोनमने तिचा एक खास लूक शेअर केला आहे, ज्यात ती व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहे.

सोनमने वेगवेगळ्या पोझ देऊन फोटो क्लिक केले आहेत. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गोल्डन ज्वेलरी, बांधलेले केस आणि न्यूड मेकअपमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक चर्चेचा विषय ठरत आहे.

सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.