कुणी लक्झरी स्पोर्ट्स कार तर कुणी हिऱ्यांचे झुमके, अनंत-राधिकाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिले महागडे गिफ्ट्स, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 06:03 PM2024-03-07T18:03:12+5:302024-03-07T18:39:32+5:30

अनंत-राधिकाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी महागडे गिफ्ट्स दिले आहेत.

बॉलिवूड सेलिब्रिटींनी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला सर्वात महागडे गिफ्ट्स दिले. कोण-कोणत्या सेलिब्रिटींनी नेमकं काय गिफ्ट दिले ते आपण पाहणार आहोत.

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटला एका लक्झरी ब्रँडचे डायमंडचे कपल वॉच गिफ्ट दिले आहे.

अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनीही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना एक महागडी भेट दिली आहे. या जोडप्याने लक्झरी ब्रँडचे ब्रेसलेट आणि डायमंड नेकलेस भेट दिलं.

बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खानने एक महागडी भेट दिली आहे.

सलमान खानने अनंत अंबानी यांना पटेक फिलिप ब्रांडचे कस्टमाइज्ड लक्झरी वॉच भेट दिलं. तर राधिका मर्चंटला हिऱ्याचे झुमके भेट दिले आहेत.

किंग खान शाहरुख खानने अनंग अंबानीला एक लक्झरी स्पोर्ट्स कार गिफ्ट केली आहे. ज्याची किंमत ५ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग पार्टीला गोल्ड आणि डायमंडच्या गणेश लक्ष्मीची मूर्ती भेट दिली आहे.

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनीही राधिकाला गुच्ची ब्रँडची महागडी हिरे जडीत पर्स भेट दिली. रणबीर कपूरने अनंत अंबानींना जॉर्डनचा सर्वात महागडा शू सेट गिफ्ट केला आहे

शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांनी राधिका मर्चंटला महागडा हिऱ्यांचा हार भेट म्हणून दिला आहे. तर अनंत अंबानी यांना एक महाग परफ्यूम भेट देण्यात आला.

बॉलिवूड सेलिब्रिटींनी अनंत-राधिकाच्या फंक्शनमध्ये खूप धम्माल केली. त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.