Palak Muchhal : "एक शो करुन १०-१२ मुलांचा वाचवते जीव"; गरजू चिमुकल्यांसाठी गायिका आहे 'देवदूत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 16:37 IST2025-03-09T16:18:35+5:302025-03-09T16:37:22+5:30

Palak Muchhal : पलकचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील आहे.

इंदौरच्या पलक मुच्छलने बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी गायली आहेत. सलमान खानच्या चित्रपटांसाठी देखील ती गायली आहे.

पलक मुच्छलने दैनिक भास्करला सांगितलं की, 'दिल से दिल तक' या मिशनच्या माध्यमातून ३४७३ मुलांची हार्ट सर्जरी केली आहे.

याच कारणामुळे पलकचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील आहे.

पलक म्हणाली की, ती सात वर्षांची होती तेव्हाच तिने लहान मुलांच्या सर्जरीची जबाबदारी घेतली.

एका मुलासाठी तिने परफॉर्म केलं. त्यामुळे ५५ हजार गोळा झाले. पण डॉक्टरांनी फ्रीमध्ये सर्जरी केली.

पलक शोज करते आणि जे पैसे मिळतात. त्यातून गरजू मुलांची सर्जरी केली जाते.

"मी आधी ३ तास गायची तेव्हा एका मुलाचा जीव वाचवू शकत होती. पण आज एकाच शोमधून १०-१२ मुलांचा जीव वाचतो."

"जेव्हा कोणत्याही मुलाची सर्जरी असते तेव्हा मी OT मध्येच असते आणि मुलांसाठी प्रार्थना करते" असं पलकने म्हटलं आहे.