अशी झाली 'तुंबाड'ची शूटींग! निर्माता-अभिनेता सोहम शाहने दाखवले कधीही न पाहिलेले BTS क्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 17:02 IST2024-09-17T16:52:48+5:302024-09-17T17:02:04+5:30
निर्माता-अभिनेता सोहम शाहने 'तुंबाड' सिनेमाच्या शूटींगचे BTS फोटो सर्वांसोबत शेअर केलेत (tumbbad)

सध्या 'तुंबाड'ची जोरदार चर्चा आहे. या सिनेमात निर्माता-अभिनेता सोहम शाहने प्रमुख भूमिका साकारली असून सिनेमाची निर्मितीही केलीय
'तुंबाड' सिनेमा पुन्हा रिलीज झाल्याबद्दल सोहम शाहने 'तुंबाड' सिनेमाचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो सर्वांसोबत शेअर केलेत
'तुंबाड' सिनेमात आधी आजीचं रुप वेगळं होतं हे फोटोमध्ये पाहायला मिळेल. पुढे खूप मेहनत करुन 'तुंबाड'मधली आजी डिझाईन करण्यात आली
आजीसारखीच गोष्ट 'तुंबाड'मधील हस्तरची. हस्तरसुद्धा आधी वेगळा बनवण्यात आला होता. त्याची भयानक झलक फोटोमध्ये बघता येईल
'तुंबाड' पुन्हा रिलीज झालाय. रिलीज होताच प्रेक्षकांनी सिनेमाला भरपूर प्रतिसाद दिलाय. सिनेमाने तीन दिवसात ७ कोटींहून अधिक कमाई केलीय
'तुंबाड' रिलीज होतानाच निर्माता-अभिनेता सोहम शाहने प्रेक्षकांना खास सरप्राइज दिलंय. ते म्हणजे 'तुंबाड २'ची घोषणा करण्यात आलीय
'तुंबाड २'च्या कथेवर सध्या काम सुरु असून प्रेक्षकांना 'तुंबाड'चा हा दुसरा भाग अर्थात सीक्वल लवकरच बघायला मिळेल