बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:22 IST2025-11-13T15:12:56+5:302025-11-13T15:22:19+5:30
बॉलिवूडची ही अभिनेत्री गेल्या बऱ्याच काळापासून कोणत्याही शो, चित्रपट किंवा वेबसीरीजमध्ये दिसलेली नाही, परंतु सोशल मीडियावर ती खूप सक्रीय असते.

ही अभिनेत्री गेल्या बऱ्याच काळापासून कोणत्याही शो, चित्रपट किंवा वेबसीरीजमध्ये दिसलेली नाही, परंतु सोशल मीडियावर ती खूप सक्रीय असते.

अभिनेत्री शमा सिकंदर नेहमीच चर्चेत असते. ही अभिनेत्री गेल्या बऱ्याच काळापासून कोणत्याही शो, चित्रपट किंवा वेबसीरीजमध्ये दिसलेली नाही, परंतु सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते.

शमा सिकंदर अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी आपल्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. पुन्हा एकदा असेच काहीसे पाहायला मिळत आहे, कारण ही अभिनेत्री आता आई झाली आहे.

शमा सिकंदर वयाच्या ४४ व्या वर्षी आई झाली आहे. तिने सोशल मीडियावर आपल्या या छोट्या परीसोबतचे फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

फोटोमध्ये शमा सिकंदर आपल्या लाडक्या लेकीला कडेवर घेऊन दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''माझे आयुष्य सध्या काहीसं असं चाललं आहे.''

मात्र, शमा सिकंदरने याबद्दल खुलासा केलेला नाही की, तिने या मुलीला जन्म दिला आहे की दत्तक घेतले आहे.

शमाच्या चाहत्यांना अपेक्षा आहे की, अभिनेत्री लवकरच याबद्दल अधिकृतपणे सांगेल की तिने मुलीला दत्तक घेतले आहे की जन्म दिला आहे.

शमा सिकंदर अनेक वर्षांपासून पडद्यापासून दूर आहे. अभिनेत्री पुनरागमन करण्याची योजना आखत आहे, पण तिला अद्याप काही खास ऑफर मिळालेली नाही.

शमा सिकंदरने आपल्यापेक्षा ४ वर्षांनी लहान असलेल्या जेम्स मिलिरॉनसोबत लग्न केले आहे. लग्नापूर्वी या दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले होते, त्यानंतर गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केले होते.

शमाचा पती जेम्स हा बिझनेसमन आहे जो कामानिमित्त विदेशात जात असतो. मात्र, तो आपला बहुतेक वेळ पत्नीसोबत मुंबईतच व्यतित करतो.

















