हिंदू की मुस्लीम, कोणत्या धर्माचं पालन करतात किंग खानची मुलं? शाहरुखने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 14:33 IST2024-03-15T14:18:22+5:302024-03-15T14:33:07+5:30
Shahrukh khan:शाहरुख कायम हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्मांमध्ये येणारे सण, उत्सव साजरे करत असतो.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल आयुष्यामुळेही कायम चर्चेत येत असतो.
शाहरुखने गौरी खानसोबत लग्न केलं असून सोशल मीडियावर कायम त्यांच्या धर्मांवरुन चर्चा होत असते.
शाहरुख कायम हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्मांमध्ये येणारे सण, उत्सव साजरे करत असतो.
शाहरुखने हिंदू धर्मीय गौरीशी लग्न केल्यामुळे त्याची मुलं नेमक्या कोणत्या धर्माचं पालन करतात? असा प्रश्न चाहत्यांना पडतो.
रिपोर्टनुसार, शाहरुखने एका मुलाखतीमध्ये त्याच्या धर्माविषयी आणि त्याची मुलं कोणत्या धर्माचं पालन करतात याविषयी भाष्य केलं आहे.
आम्ही कधीच मुलांशी याविषयी बोलत नाही. माझी पत्नी हिंदू आहे आणि मी मुस्लीम. त्यामुळे आमची मुलं हिंदुस्तानी आहेत.
"माझी मुलं ज्यावेळी शाळेत गेली त्यावेळी शाळेत फॉर्म भरुन द्यायचा होता. त्यात धर्माचा कॉलम होता. त्यावेळी सुहानाने मला विचारलं होतं, की पापा आपण कोणत्या धर्माचे आहोत? त्यावेळी मी तिला भारतीय आहोत असं सांगितलं होतं. कोणताही धर्म नसतो आणि तो नसलाच पाहिजे."
पुढे तो म्हणतो, "मी नमाज पठण करतो. पण म्हणून मला श्रीरामाचा जयघोष ऐकण्याचा कोणताच त्रास नाही. मी माझ्या मुलांना माणूसकी शिकवली आहे आणि त्यांनी गर्वाने भारतीय असल्याचं सांगावं."
शाहरुखने १९९१ मध्ये गौरी छिब्बर हिच्यासोबत लग्न केलं. त्यांना आर्यन, सुहाना आणि अबराम ही तीन मुलं आहेत.
शाहरुख २०२३ मध्ये पठाण, जवान आणि डंकी या सिनेमांमध्ये झळकला होता.