PHOTOS : ‘मन्नत’ बाहेर हजारोंची गर्दी, मध्यरात्री असा साजरा झाला ‘किंगखान’ शाहरुखचा वाढदिवस...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 10:31 IST2022-11-02T10:19:09+5:302022-11-02T10:31:59+5:30

Shah Rukh Khan birthday : दरवर्षीप्रमाणे यंदाही शाहरूखच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी ‘मन्नत’ बाहेर प्रचंड गर्दी केली. मंगळवारी रात्रीपासूनचं ‘मन्नत’ बाहेरच्या रस्त्यावर शेकडो लोक जमले.

किंगखान शाहरुख खानचा आज वाढदिवस. किंगखानचा वाढदिवस म्हटल्यानंतर ‘मन्नत’बाहेर गर्दी जमणार नाही, हे शक्यचं नाही.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शाहरूखच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी ‘मन्नत’ बाहेर प्रचंड गर्दी केली. मंगळवारी रात्रीपासूनचं ‘मन्नत’ बाहेरच्या रस्त्यावर शेकडो लोक जमले.

यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या चाहत्यांनी ‘मन्नत’ बाहेर अक्षरश: दिवाळी साजरी केली. फटाके फोडून आतिषबाजी करण्यात आली.

चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी बॉलिवूडचा बादशाह बाल्कनीत आला आणि त्यांनी चाहत्यांना हात जोडून अभिवादन केलं.

चाहत्यांचं प्रेम पाहून शाहरूख भारावून गेला. छोटा अबरामही त्याच्यासोबत होता. यावेळी एसआरकेने आपल्या मोबाईलमधून फॅन्ससोबत सेल्फी सुद्धा घेतली.

गेली दोन वर्ष कोरोनाचे सावट असल्यामुळे शाहरूला चाहत्यांसोबत वाढदिवस साजरा करता आला नव्हतो. मात्र यावेळी चाहत्यांनी ‘मन्नत’ बाहेर एकच गर्दी केली.

शाहरूख बाल्कनीत येताच आपल्या या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी आतूर असलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. तो क्षण बघण्यासारखा होता.

2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीत जन्मलेल्या शाहरुखने टेलिव्हिजनवरील मालिकांमधून आपला ठसा उमटवला आणि यानंतर तो चित्रपटांकडे वळला.

रुपेरी पडद्यावरचा त्याचा पहिला चित्रपट दीवाना होता. यानंतर डर, अंजाम आणि बाजीगर सारख्या काही चित्रपटांमध्ये त्याने नकारात्मक भूमिका केल्या.

राजू बन गया जेंटलमन आणि फिर भी दिल है हिंदुस्तानी, डुप्लिकेट, देवदास, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, माय नेम इज खान आणि चक दे सारख्या चित्रपटांमधून शाहरूख घराघरात पोहोचला.

शाहरुख खानने रईस आणि डॉन सारख्या चित्रपटातही क्राइम गँगस्टरची भूमिका साकारली. शाहरुख खान तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.