'सॅम बहादूर' सिनेमासाठी विकीने घेतली 'इतकी' फी, जाणून घ्या इतर कलाकारांच्या मानधनाचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 07:11 PM2023-11-30T19:11:16+5:302023-11-30T19:21:12+5:30

विकी कौशलबरोबर 'सॅम बहादूर' सिनेमात सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटासाठी कलाकारांनी तगडं मानधन घेतल्याची चर्चा आहे.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या 'सॅम बहादूर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो सिनेमा अखेर शुक्रवारी(१ डिसेंबर) प्रदर्शित होणार आहे.

'सॅम बहादूर' चित्रपटातून फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं असून विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे.

'सॅम बहादूर'मध्ये माणेकशॉ यांची भूमिका साकारण्यासाठी विकी कौशलने खूप मेहनत घेतली आहे. सिनेमाच्या टीझरमध्येच त्याच्या अभिनयाची झलक पाहून चाहते थक्क झाले होते.

विकी कौशलबरोबर या सिनेमात सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटासाठी कलाकारांनी तगडं मानधन घेतल्याची चर्चा आहे.

'सॅम बहादूर' सिनेमात सान्या मल्होत्राने माणेकशॉ यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी सान्या मल्होत्राने १ कोटी मानधन घेतल्याची माहिती आहे.

या चित्रपटात अभिनेत्री फातिमा शेख इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी फातिमाने १ कोटी रुपये आकारले आहेत.

सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत विकी कौशलला पाहून सगळेच थक्क झाले होते. विकी कौशलने ही भूमिका साकारण्यासाठी तगडं मानधन घेतलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, विकीने सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारण्यासाठी १० कोटी रुपये मानधन घेतलं आहे.