'तेरे नाम'मध्ये 'या' अभिनेत्याला होती 'राधे'ची ऑफर, नकार दिल्याने उजळलं सलमानचं नशीब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:16 IST2025-04-03T17:05:04+5:302025-04-03T17:16:31+5:30

'तेरे नाम'मध्ये सलमानचं 'राधे' हे कॅरेक्टर खूप गाजलं. त्याच्यासारखी हेअरस्टाईल करण्याचा तर तेव्हा ट्रेंडच निघाला होता.

२००३ साली आलेला सलमान खानचा 'तेरे नाम' सिनेमा सर्वांच्यात लक्षात असेल. हा सिनेमा आणि यातील गाणी तर आयकॉनिक ठरली होती.

'तेरे नाम' मध्ये सलमानची युनिक हेअरस्टाईल होती. सिनेमानंतर सगळेच त्याच्यासारखी हेअरस्टाईल करायला लागले. तसा ट्रेंडच सुरु झाला.

त्याकाळी सलमानचे अनेक सिनेमे सुपरहिट होते होते.'मैने प्यार किया' ते 'हम साथ साथ है' या सिनेमांमधून त्याने छाप पाडली होती. 'तेरे नाम'ने सलमानला वेगळ्या उंचीवर नेलं.

या सिनेमात भूमिका चावला मुख्य अभिनेत्री होती. हिमेश रेशमियाने सिनेमासाठी म्युझक दिलं होतं. यातली गाणी आजही सगळीकडे ऐकली जातात.

पण तुम्हाला माहितीये का सतीश कौशिक दिग्दर्शित या सिनेमासाठी सलमानच्या आधी एक नाही तर दोन अभिनेत्यांना विचारणा झाली होती.

'तेरे नाम'साठी अजय देवगणला ऑफर मिळाली होती. त्याच्याही आधी संजय कपूरला विचारलं गेलं होतं. दोघांनी नकार दिल्यानंतर सलमान खानकडे सिनेमा गेला आणि त्याने होकार दिला.

१२ कोटींमध्ये बनलेल्या या सिनेमाने २४ कोटी इतकी तगडी कमाई केली होती. सिनेमाला २२ वर्ष झाली असून आजही तो चाहत्यांच्या मनात ताजा आहे.