'या' 5 कलाकारांसोबत आहे सलमानचा 36चा आकडा; एकाने तर भरपार्टीत केला होता भाईजानचा अपमान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 07:00 PM2023-08-27T19:00:00+5:302023-08-27T19:00:00+5:30

Salman khan:कलाविश्वात असे काही कलाकार आहेत ज्यांच्यासोबत सलमानचं जराही पटत नाही

भाईजान, दबंग खान, सल्लूभाई अशा कितीतरी नावाने आज लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे सलमान खान (Salman Khan). उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारा सलमान त्याच्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वामुळेही ओळखला जातो.

आजवरच्या कारकिर्दीत सलमानने अनेक गरजूंना मदत केली आहे. इतकंच नाही तर कलाविश्वात आज त्याचे असंख्य मित्र असल्याचं पाहायला मिळतं.

कलाविश्वात सलमानचे जितके मित्र आहेत. तितकेच त्याचे काही शत्रूदेखील आहे. यात अशा दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. ज्यांच्यासोबत सलमानचं जराही पटत नाही.

विवेक ओबेरॉय - विवेक आणि सलमान यांच्यातील वाद सगळ्यांनाच ठावूक आहे. ऐश्वर्यामुळे या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्या वादाला आज बरीच वर्ष झाली. तरीदेखील हे दोघं एकमेकांचं तोंड पाहत नाहीत.

प्रियांका चोप्रा - प्रियांका चोप्रा आणि सलमान खान एकमेकांचे चांगले मित्र होते. परंतु, प्रियांकाने सलमानचा भारत हा सिनेमा करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्या मैत्रीत फूट पडल्याचं सांगण्यात येतं.

रणबीर कपूर - रणबीर कपूरचे तसे कलाविश्वात फारसे कोणासोबत वाद नाहीत. परंतु, त्याने सलमानसोबत पंगा घेतला आहे. एकेकाळी कतरिना कैफ आणि सलमानच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, याच काळात रणबीर आणि कतरिनाची मैत्री झाली. त्यामुळे सलमानने रणबीरशी असलेली मैत्री तोडली.

शाहिद कपूर - शाहिद आणि सलमान यांच्यात तसं कोणतंही वैर नव्हतं. मात्र, एका कार्यक्रमात शाहिदने सलमान खानची मस्करी केली होती. त्याला अपमानित केलं होतं. ज्यामुळे सलमान त्याच्यावर नाराज झाला.

अरजीत सिंह - प्रसिद्ध गायक अरजीत सिंह यानेही एका कार्यक्रमात सलमान खानच्या सूत्रसंचालनाच्या स्टाइलची मस्करी केली होती. ज्यामुळे अरजीत , सलमानच्या हिट लिस्टवर आला.