भाईसाब, ये किस लाईन में आ गए आप... ! नेटकऱ्यांनी घेतली सैफूची मजा, Memes पाहून खो-खो हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 16:13 IST2020-08-25T16:03:56+5:302020-08-25T16:13:30+5:30

सैफच्या आत्मचरित्रावरून ट्विटरवर मीम्सचा जणू पूर आला आहे. सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

करिना दुस-यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सैफने ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. आता सैफने आणखी एक आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. होय, सैफ आता आत्मचरित्र लिहिणार आहे. पुढील वर्षी त्याचे हे आत्मचरित्र प्रकाशित होईल. सैफचे आत्मचरित्र वाचायला मिळणार म्हणून त्याचे चाहते खूश आहे. पण ट्विटरवर मात्र सैफच्या आत्मचरित्रावरून मीम्सचा जणू पूर आला आहे. सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

Read in English