रोहित शेट्टींच्या घराबाहेर गोळीबार; सलमान, दिशासह 'या' ५ सेलिब्रिटींसोबत घडल्यात अशा घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 11:12 IST2026-02-01T10:41:51+5:302026-02-01T11:12:05+5:30
Rohit Shetty House Firing: मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास रोहित शेट्टींच्या घराबाहेर अज्ञातांनी ४ गोळ्या झाडल्या

प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील घराबाहेर रविवारी मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलिस जुहू येथील घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण परिसराला घेराव घातला.

पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पहाटे ३ वाजता अज्ञात हल्लेखोरांनी रोहित शेट्टी यांच्या घरावर चार गोळ्या झाडल्या. घटनेचा तपास सुरू आहे. घराबाहेर सुरक्षा दल तैनात करण्यात आले. हल्लेखोरांचा हेतू काय होता हे अद्याप कळलेले नाही.

रोहित शेट्टींच्या घरावरील गोळीबाराच्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. पण याआधी बॉलिवूड व इतर सेलिब्रिटींच्या बाबतीतही अशाच गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...

कपिल शर्मा:-
कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅप्स कॅफेवर तीन वेळा गोळीबार करण्यात आला आहे. पहिला १० जुलै २०२५ रोजी, दुसरा ७ ऑगस्ट २०२५ रोजी आणि तिसरा ऑक्टोबर २०२५ मध्ये झाला. बिश्नोई टोळीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

दिशा पटानी:-
१२ सप्टेंबर २०२५ रोजी अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घराबाहेर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. दोन्ही हल्लेखोर चकमकीत मारले गेल्याची महत्त्वाची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.१२ सप्टेंबर २०२५ रोजी अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घराबाहेर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. दोन्ही हल्लेखोर चकमकीत मारले गेल्याची महत्त्वाची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

सलमान खान:-
१४ एप्रिल २०२४ रोजी सलमान खानच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या प्रकरणात दोघांना अटक देखील करण्यात आली आहे. नंतर मात्र दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला.

एपी ढिल्लो:-
सप्टेंबर २०२४ मध्ये, प्रसिद्ध पंजाबी गायक एपी ढिल्लो याच्या कॅनेडातील घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित रोहित गोदाराने या घटनेची जबाबदारी स्वीकारली आणि त्याला सोशल मीडियावरून धमकीही दिली.

एल्विश यादव:-
१७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास युट्यूबर एल्विश यादवच्या गुरुग्राम येथील घरावर गोळीबार करण्यात आला होता. हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही टोळीने स्वीकारली नाही. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली.

















