धनश्रीपासून घटस्फोट घेताच युझवेंद्र चहलच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचे नवे फोटो चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:24 IST2025-03-20T18:17:47+5:302025-03-20T18:24:30+5:30

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. या घटस्फोटाच्या आधी चहलची रुमर्ड गर्लफ्रेंड आरजे माहवशने काही फोटो अपलोड केले आहेत.
या फोटोंची सध्या सगळीकडेच चर्चा चालू आहे.
आरजे माहवश आणि युजवेंद्र एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच तिच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केलेले दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवर लाल रंगाचा हार्ट आहेत.
या फोटोशूटमध्ये तिने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केलाय.
आरजे माहवश आणि युजवेंद्र हे 'आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025'च्या अंतिम सामन्यात दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये एकत्र दिसले होते. तेव्हापासून दोघांची चर्चा सुरू आहे.
या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. पण, ते अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.
माहवश आणि युजवेंद्र चहल यांच्या डेटिंगच्या अफवा पहिल्यांदा डिसेंबर २०२४ मध्ये आल्या होत्या. जेव्हा महवाशने ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले होते, ज्यामध्ये युजवेंद्र देखील दिसला होता.
धनश्री वर्मापासून वेगळे झाल्यानंतर आता युजवेंद्र माहवश हिच्या प्रेमात असल्याची चर्चा रंगली आहे
माहवशच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर एक नजर टाकली तर तुम्हाला कळेल की ती एक फॅशनिस्टापेक्षा कमी नाही.
अगदी लहान वयात तीने खूप लोकप्रियता मिळवली आहे. तिचा फॅशनसेन्स खूपच चांगला आहे.