Rishab Shetty : ‘Kantara’ यशस्वी होताच सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचला ऋषभ शेट्टी, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 11:52 AM2022-10-31T11:52:40+5:302022-10-31T12:02:31+5:30

Rishab Shetty, Kantara : रविवारी ऋषभ शेट्टी मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचला. यावेळी ऋषभने मनोभावे पूजाअर्चा करून बाप्पाचे आशीर्वाद घेतले...

ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने नुसता धुमाकूळ घाातला आहे. आपला सिनेमा इतका यशस्वी होईल, याची कल्पना खुद्द ऋषभ शेट्टीने सुद्धा केली नव्हती. आता चित्रपट सुपरडुपर हिट झाल्यावर ऋषभ शेट्टीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

यासाठी देवाचे आभार मानायलाच हवेत. रविवारी 30 ऑक्टोबरला ऋषभ शेट्टी मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचला. यावेळी ऋषभने मनोभावे पूजाअर्चा करून बाप्पाचे आशीर्वाद घेतले.

ऋषभला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. चाहत्यांचं हे प्रेम पाहून ऋषभ भारावून गेला. मंदिराबाहेर चाहत्यांसोबत त्याने अनेक पोझ दिल्यात.

पापाराझींनाही त्याने निराश केलं नाही. त्यांनाही त्याने पोझ दिल्या. यावेळी ऋषभच्या चेहरा आनंदाने उजळून निघाला होता.

ऋषभ शेट्टीचा कांतारा हा सिनेमा मूळ कन्नड भाषेत बनला. 30 सप्टेंबरला कन्नड भाषेत तो रिलीज झाला. पण चित्रपटाला मिळालेला उदंड प्रतिसाद बघता, हा सिनेमा हिंदीत डब करण्यात आला. चित्रपटाचं हिंदी डब व्हर्जन गेल्या 14 ऑक्टोबरला रिलीज झालं.

कांतारा या चित्रपटाने वल्डवाईड 250 कोटींची कमाई केली आहे. केवळ 15 कोटी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये 226.75 कोटींचा बिझनेस केला.

कांतारा या चित्रपटात ऋषभ शेट्टी लीड रोलमध्ये आहे. तोच या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि चित्रपटाची कथाही त्यानेच लिहिली आहे.

कांतारा या चित्रपटातील देव कोलाचा सीक्वेंन्स शूट करण्याच्या 20-30 दिवस आधी ऋषभने मांसाहाराचा त्याग केला होता.

चित्रपटात एक सीन आहे, ज्यात ऋषभ शेट्टीची जळत्या दांड्याने पिटाई होते. हा सीन रिअल होता आणि हा शूट करताना ऋषभची पाळ पोळली होती.