आता अशी दिसते ‘हेराफेरी’ची रिंकु, फोटो पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 17:15 IST2020-04-02T17:05:00+5:302020-04-02T17:15:40+5:30
हेराफेरीची रिंकु आठवते?

2000 साली प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेल्या हेराफेरी हा सिनेमा प्रचंड गाजला होता. अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमातील आणखी एक चेहरा तुम्हाला आठवत असेल. ती म्हणजे रिंकु नावाची चिमुरडी. ही चिमुरडी आता कशी दिसते ते पाहा़...

रिंकुची भूमिका ऐन अॅलेक्सिया ऐनरा हिने साकारली होती़ ऐन आता बरीच मोठी झाली आहे.

ऐनने रिंकूची भूमिका साकारली होती़ देवी प्रसादच्या नातीची भूमिका तिने केली होती.

चित्रपटात काही गुंड रिंकुला किडनॅप करतात, असे दाखवले होते.

हीच रिंकु आता 30 वर्षांची झाली आहे आणि फिल्मी दुनियेपासून बरीच लांब आहे.

हेराफेरीशिवाय ऐनने कमल हासन यांव्या अवई शानमुगी या तामिळ सिनेमात त्यांच्या मुलीची भूमिका साकारली होती.

या दोन सिनेमानंतर ऐनने फिल्मी दुनियेला रामराम ठोकला.

ऐन चित्रपटात काम करू नये, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती, या इच्छेखातर ऐनने फिल्मी दुनिया कायमची सोडली.

सध्या ती भंगारापासून उपयोगी वस्तू बनवण्याचा बिझनेस करते.

भटकंतीची आवड असलेली ऐन सोशल मीडियावर ब-यापैकी अॅक्टिव्ह आहे.

















