कोण आहे ईशा रिखी? जिच्या प्रेमात बादशहा झाला वेडा; पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर पुन्हा थाटला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:59 IST2026-03-25T15:30:30+5:302026-03-25T15:59:24+5:30

पहिल्या पत्नीपासून वेगळं झाल्यानंतर बादशहाच्या आयुष्यात आली ईशा रिखी; कोण आहे ती?

पंजाबी गायक आणि रॅपर बादशहा सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. बादशहाच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

बादशहानं पंजाबी अभिनेत्री ईशा रिख हिच्याशी गुपचुप लग्न उरकलं आहे. ईशा रिखीच्या आईने सोशल मीडियावर लग्नाचे काही 'इनसाइड' फोटो शेअर केलेत.

बादशहाच्या लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला. बादशहाच्या पत्नीबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून "ईशा रिखी नेमकी कोण?" असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

ईशा रिखी या पंजाबी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहेत. तिनं २०१३ मध्ये 'जट्ट बॉयज पुत्त जट्टां दे' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने 'हॅप्पी गो लकी' (२०१४) आणि 'अरदास' (२०१६) या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

याशिवाय २०१८ मध्ये तिनं 'नवाबजादे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्येही एन्ट्री केली. या चित्रपटात वरुण धवन, राघव जुयाल आणि पुनीत पाठक हे अभिनेते होते.

अभिनयासोबतच ईशा रिखी यांनी अनेक म्युझिक व्हिडीओ आणि जाहिरातींमध्येही काम केले आहे. करिअरच्या सुरुवातीला तिनं मॉडेलिंग केली होती.

बादशहा आणि ईशा रिखी गेल्या ४ ते ५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. पण, बादशहाने ईशासोबतच्या नात्यावर कधीही उघडपणे भाष्य केले नव्हते. अगदी गेल्या वर्षी लग्नाच्या चर्चा रंगल्या तेव्हा बादशहाने त्या केवळ 'अफवा' असल्याचे म्हटले होते.

बादशहाचं हे दुसर लग्न (Badshah Second Wedding) आहे. जॅस्मिन मसीह ही बादशहाची पहिली पत्नी होती. दोघांची ओळख सोशल मीडियावरून झाली आणि त्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये लग्न केले होते. जवळपास आठ वर्षे एकत्र राहिल्यानंतर २०२० च्या सुमारास त्यांचा घटस्फोट झाला.

बादशहा आणि जॅस्मिन या दोघांनीही अधिकृतपणे वेगळं होण्याचं नेमकं कारण सांगितलेलं नाही. मात्र, वैयक्तिक मतभेद आणि नात्यातील जुळवाजुळव न होणं ही कारणे असल्याचं बोललं जातं. स्वतः बादशहानेही काही मुलाखतींमध्ये नातं टिकवण्याचा प्रयत्न केला होता, असं सूचित केलं होतं.

बादशा सध्या सुमारे १२४ कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. तो बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या आणि यशस्वी कलाकारांपैकी एक आहे. बादशहा प्रत्येक गाण्यासाठी आणि लाईव्ह शोसाठी मोठी रक्कम आकारतो. त्याच्याकडे दिल्ली, चंदीगड आणि मुंबईत कोट्यवधींचे आलिशान घर आहे. याव्यतिरिक्त, त्याच्याकडे Rolls-Royce, Lamborghini, Porsche यांसारख्या महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.

टॅग्स :बादशहाBadshah