रणवीर सिंगने दाखवली काशीची मनमोहक झलक, मनिष मल्होत्रा आणि क्रिती सनॉनसह घेतलं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 04:59 PM2024-04-16T16:59:07+5:302024-04-16T17:28:44+5:30

अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि क्रिती सनॉन (Kriti Sanon) हे दोघं सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या शोसाठी एका इव्हेंटसाठी वाराणसीत पोहचले होते.

वाराणसी शहरातील नमो घाटाजवळ हा फॅशन शो पार पडला. याचे आयोजन मनीष मल्होत्रानं केले होते. या फॅशन शोचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रणवीर सिंग, क्रिती सनॉन आणि मनीष मल्होत्रा यांनी काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतले. याचे काही फोटो रणवीरनं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

रणवीरनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तो हात जोडून उभा असल्याचा दिसत आहे. हा फोटो शेअर करताना त्याने कॅप्शन दिले की, "काशीमधील अद्भुत अनुभव. येथील लोकांचे प्रेम अनुभवले आणि महादेवाचा आशीर्वादही घेतला. हा दिवस खूप खास आणि संस्मरणीय होता'.

यावेळी रणवीर सिंग हा पारंपारीक लूकमध्ये दिसून आला. त्याने पाढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

रणवीरने काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतले. यानंतर एएनआयला दिलेल्या मुलाखतीत रणवीर दर्शन घेऊन धन्य झाल्याचं म्हटलं. मी व्यक्त होऊ शकत नाही असा अनुभव आज मला आला आहे, असेही तो म्हणाला.

अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना अभिवादन केलं आणि त्यांच्याशी भेटला. यामुळे त्याचे चाहतेही खुश झाले.

रणवीर सिंग याने क्रिती सनॉन आणि मनीष मल्होत्रा यांच्यासोबतचाही फोटो शेअर केला. यात तिघेही आनंदी दिसून आले.

रणवीर आणि क्रिती यांनी मनीष मल्होत्रासोबत काशी विश्वनाथ मंदिरात पूजा केली. यावेळी क्रितीने पारंपारिक पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचं दिसून आले.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास रणवीर सिंग हा लवकरच 'डॉन 3' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर क्रितीचा 'क्रू' हा चित्रपट २९ मार्च रोजी प्रदर्शित झाला, ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.