Ufff!! रणबीर- वाणी कपूरचं सुपरहॉट फोटोशूट, पाहून आलियाचाही होईल जळफळाट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 04:27 PM2022-07-06T16:27:12+5:302022-07-06T16:33:39+5:30

Ranbir Kapoor and Vaani Kapoor bold photoshoot : वाणी व रणबीर कपूरने नवं फोटोशूट केलं आहे आणि यातील दोघांची सिजलिंग केमिस्ट्री पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. दोघांचे क्लोजी फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

बॉलिवूडचा हँडसम हंक रणबीर कपूर लवकरच ‘शमशेरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आहे ती ग्लॅमरस अ‍ॅण्ड बोल्ड वाणी कपूर. चित्रपटाच्या ट्रेलरमधील या दोघांची केमिस्ट्री तुम्ही पाहिली असेलच. आता दोघांचे हे फोटोशूटही तुम्ही बघायलाच हवं.

वाणी व रणबीर कपूरने नवं फोटोशूट केलं आहे आणि यातील दोघांची सिजलिंग केमिस्ट्री पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. दोघांचे क्लोजी फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

फोटोंमध्ये रणबीर शर्टलेस झाला आहे आणि वाणी कपूरने ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये सुपरहॉट पोझ दिल्या आहेत. हे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

फोटोंमध्ये खूपच हॉट दिसत आहे.फोटोमध्ये वाणीने काळ्या रंगाचा हॉट ड्रेस घातला आहे, या नेटच्या गाऊनमध्ये वाणी खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे. रणबीरने ब्लड रेड कलरचा शूट घातला आहे, ज्याची बटणे उघडी आहेत.

वाणी व रणबीरच्या या सुपरहॉट फोटोंवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत. आलिया मॅडमची भीती वाटत नाही का सरजी? अशी कमेंट एका युजरने रणबीरला उद्देशून केली आहे.

बाहर प्लेबॉय, घर में फॅमिली मॅन, अशी कमेंट करत एकाने रणबीरला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. आलियाचा जळफळाट होत असणार, असंही अनेकांनी म्हटलं आहे.

‘शमशेरा’ या चित्रपटात रणबीर डबल रोलमध्ये दिसणार आहे. तर वाणी कपूर सोना नावाच्या एका डान्सरची भूमिका साकारताना दिसणार आहे. यात संजय दत्त निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे.

‘शमशेरा’ चित्रपट करण मल्होत्राने दिग्दर्शित केला आहे. येत्या 22 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.