राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘बधाई दो’ चित्रपटाचे सुरू झाले चित्रीकरण, पाहा फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 19:47 IST2021-01-06T19:46:57+5:302021-01-06T19:47:38+5:30

भूमी पेडणेकर आणि राजकुमार रावने बधाई दो च्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून सोशल मीडियावर याचे फोटो शेअर केले आहेत.

हा चित्रपट ‘बधाई हो’ या चित्रपटाचा सीक्वल असणार आहे.

उत्तराखंडमध्ये बधाई दो या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

नवीन सुरुवातीसाठी सगळ्या टीमला शुभेच्छा असे कॅप्शन भूमीने या फोटोला दिले आहे.

‘बधाई दो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णी यांनी केले आहे.

हर्षवर्धन यांनी याआधी हंटर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

‘बधाई हो’ या चित्रपटाचे लेखन सुमन अधिकारी आणि अक्षत घिल्डियाल यांनी केले होते. बधाई दो या चित्रपटाचे लेखन देखील त्यांचेच आहे.

‘बधाई हो’ या चित्रपटात आयुषमान खुराणा, नीना गुप्ता यांच्या मुख्य भूमिका होत्या.

















