PHOTOS : ‘राज’मधील हँडसम डिनो मोरियाला ओळखणंही झालं कठीण, इतका बदलला लुक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 03:46 PM2022-12-18T15:46:02+5:302022-12-18T16:02:56+5:30

Dino Morea : महेश भट यांच्या ‘राज’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारा डिनो या चित्रपटानंतर एका रात्रीत स्टार झाला. हा ‘लंबी रेस का घोडा’ ठरणार असं वाटतं असतानाच प्रत्यक्षात डिनो फार काही कमाल करू शकला नाही...

‘राज’ या चित्रपटात दिसलेला बॉलिवूडचा हॅण्डसम अभिनेता डिनो मोरिया तुम्हाला आठवत असेलच. आत्ताचा डिनो पाहाल तर चाट पडाल. होय, या फोटोत डिनोला ओळखणंही कठीण आहे.

महेश भट यांच्या ‘राज’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारा डिनो या चित्रपटानंतर एका रात्रीत स्टार झाला. हा ‘लंबी रेस का घोडा’ ठरणार असं वाटतं असतानाच प्रत्यक्षात डिनो फार काही कमाल करू शकला नाही.

गेल्या काही दिवसांत डिनो अगदीच बदलला आहे. वाढलेले केस, वाढलेली दाढी अशा वेगळ्या रूपात तो पाहायला मिळतोय.

आज डिनो रूपेरी पडद्यावरून गायब आहे. पण एकेकाळी याच डिनोवर तरूणी फिदा होत्या. अलीकडे डिनोने दाढी वाढवलीये, केसही वाढवलेत.

डिनोने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 1999 मध्ये आलेल्या ‘प्यार मे कभी कभी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला.

त्याचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. मात्र त्यानंतर आलेल्या ‘राज’ या हॉरर सिनेमाने आणि ‘गुनाह’ या थ्रिलर चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख मिळवून दिली.

‘राज’नंतर डिनो अनेक सिनेमात दिसला. पण हे सर्व चित्रपट एकापाठोपाठ आपटले. चित्रपट चालत नाहीत, म्हटल्यावर डिनो रिअ‍ॅलिटी शोकडे वळला.

2010 मध्ये ‘खतरों के खिलाडी’चे विजेतेपदही त्याने पटकावले. पण यानंतर डिनोला चित्रपट मिळणं बंद झालं.

हाताला काम हवे म्हणून डिनोने डीएम जिम नावाने एक फिटनेस सेंटर उघडले होतं. यात तत्कालीन युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचीही भागीदारी होती.

2016 मध्ये आदित्यसोबत झालेल्या वादानंतर डिनोने हे फिटनेस सेंटर बंद केलं. यानंतर डिनोने त्याच्या कॅफे बिझनेसवर लक्ष केंद्रीत केलं.

2014 मध्ये शाहरूखच्या ‘हॅपी न्यू ईअर’मध्ये तो अखेरचा झळकला होता. अलीकडच्या काळात अनेक वेबसीरिजमध्ये तो दिसला.