PHOTOS: शाहरुख खानची लेक सुहानाने इंस्टाग्रामवर शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 17:54 IST2020-12-12T17:54:09+5:302020-12-12T17:54:09+5:30

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान वडीलांसारखी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. सुहाना सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
सुहानाच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत असते. तिचे फोटो व्हायरल होताना दिसतात.
सुहाना खानने नुकतेच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुहाना आपल्या फ्रेंडसोबत दिसते आहे.
सुहानाने फोटो शेअर करत मिस यू असे लिहिले आहे. फोटोमध्ये प्रिटेंड टॉप आणि डेनिममध्ये सुहाना खूप क्युट दिसते आहे.
यापूर्वीही सुहानाचे फोटो व व्हिडीओ बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
फोटोवर कमेंट करत सुहानाची खास मैत्रीण शनाया कपूर ब्युटी अशी कमेंट केली आहे. तर तिच्या एका फॅनने कमेंट करत लिहिले की, तुझी फिटनेस खूप छान आहे.
सुहानाने अद्याप बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली नाही पण तिच्या नावाची बऱ्याचदा चर्चा ऐकायला मिळते.