'बजरंगी भाईजान'चा क्लायमॅक्स सीन ते 'राजी' अन् 'बेताब'; जिथे हल्ला झाला त्या पहलगामची बॉलिवूडलाही भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 15:38 IST2025-04-25T13:13:02+5:302025-04-25T15:38:48+5:30
पहलगाममध्ये शूट झालाय 'बजरंगी भाईजान'चा क्लायमॅक्स सीन, एका बॉलिवूड सिनेमामुळे पडलं व्हॅलीला नाव

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हळहळला आहे. सर्वच स्तरातून या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. स्वर्गसुख देणाऱ्या काश्मीरला नरक यातना भोगाव्या लागत आहेत.
निसर्गसौंदर्य असणाऱ्या काश्मीरची भुरळ पर्यटकांप्रमाणेच बॉलिवूडलाही पडली.
अनेक बॉलिवूड सिनेमांचं शूटिंग काश्मीरमध्ये झालं आहे. यामध्ये सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' हा सिनेमादेखील आहे.
जिथे दहशतवादी हल्ला झाला त्या भागात 'बजरंगी भाईजान'चा क्लायमॅक्स सीन शूट करण्यात आला आहे.
पहलगाममधील बेताब व्हॅली येथे या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. तर मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या बैसरन मॅडोमध्ये सिनेमाचा काही भाग शूट करण्यात आला आहे.
शाहिद कपूरच्या 'हैदर' सिनेमाचं शूटिंगही पहलगाम व्हॅलीमध्ये झालं आहे.
१९८३ साली पहलगाम व्हॅलीमध्ये 'बेताब' सिनेमाचं शूटिंग झालं होतं. त्यानंतर या व्हॅलीला बेताब व्हॅली असं नाव पडलं. या बेताब व्हॅलीतच 'बॉबी', 'रोटी' आणि 'खामोश' या बॉलिवूड सिनेमांचं शूटिंगही झालं आहे.
आलिया भट मुख्य भूमिकेत असलेल्या 'हायवे' आणि 'राझी' या दोन्ही सिनेमांचा काही भाग पहलगाम व्हॅलीत शूट करण्यात आला आहे.
शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत असलेल्या 'जब तक है जान' सिनेमात पहलगाम व्हॅलीतील निसर्गसौंदर्य पाहायला मिळालं आहे.
विजय देवराकोंडा आणि समांथा रुथ प्रभू मुख्य भूमिकेत असलेल्या खुशी या साऊथ सिनेमाचं शूटिंगही पहलगाममध्ये झालं आहे.