Photos: ऑस्कर सोहळ्यात अंबानीच्या लेकीची ग्रँड एन्ट्री, ईशा अंबानींचा स्वॅग पाहून हॉलिवूड स्टार्सही थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:01 IST2026-03-16T12:13:35+5:302026-03-16T13:01:22+5:30
ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला बिजनेसमॅन मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी यांनीही ग्रँड एन्ट्री घेतली. रेड कार्पेटवर ईशा अंबानींचा स्वॅग पाहून हॉलिवूड स्टार्सही थक्क झाल्याचं पाहायला मिळालं.

Oscars Awards 2026: मनोरंजन विश्वातील अतिशय प्रतिष्ठित आणि मानाचा मानला जाणारा ९८वा अकादमी पुरस्कार सोहळा आज अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला.

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा प्रेझेंटर म्हणून झळकली.

पण, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते ईशा अंबानी यांनी. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला बिजनेसमॅन मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी यांनीही ग्रँड एन्ट्री घेतली.

रेड कार्पेटवर ईशा अंबानींचा स्वॅग पाहून हॉलिवूड स्टार्सही थक्क झाल्याचं पाहायला मिळालं.

पती आनंद पिरमल यांच्यासह ईशा अंबानी पहिल्यांदाच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.

ईशा अंबानींनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला होता. स्ट्रेपलेस डिझायनर गाऊन त्यांनी परिधान केला होता.

गळ्यात चोकर आणि मोठे कानातले अशी फॅशन ईशा अंबानींनी केल्याचं दिसून आलं.

केस मोकळे सोडल्याने त्यांच्या लूकला चार चांद लागले होते. ईशा अंबानींवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील ईशा अंबानींचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले आहेत.

















