हार्दिकची Ex पत्नी नताशाचा पूलमध्ये जलवा! मोनोकिनीमधील 'बोल्ड' फोटो पाहून चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:42 IST2026-02-10T16:34:20+5:302026-02-10T16:42:38+5:30

नताशाचा पूलमधील 'किलर लूक' पाहून चाहते मंत्रमुग्ध झाले आहेत.

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याची माजी पत्नी आणि अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच आपल्या बोल्ड स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.

अलीकडेच नताशाने सोशल मीडियावर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. पूलमधील तिचा हा 'किलर लूक' पाहून चाहते मंत्रमुग्ध झाले आहेत.

नताशाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती अतिशय स्टायलिश अ‍ॅबस्ट्रॅक्ट प्रिंट असलेल्या मोनोकिनीमध्ये दिसत आहे.

जांभळा, नारंगी आणि काळा अशा रंगांची ही मोनोकिनी तिच्यावर खूपच खुलून दिसत आहे.

विशेष म्हणजे, तिने आपल्या कुरळ्या केसांमध्ये एक लहान गुलाबी फूल माळले आहे, ज्यामुळे तिच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.

पूलच्या रेलिंगवर फळांची प्लेट आणि आजूबाजूला हिरवळ दिसून येतंय. तिचा हा 'नो-फिल्टर' आणि रिलॅक्स लूक चाहत्यांच्या पसंतीस पडलाय.

नताशा आणि हार्दिक पांड्या ३१ मे २०२० रोजी विवाहबंधनात अडकले होते. त्यांना 'ऑगस्त्य' नावाचा मुलगा आहे.

अखेर जुलै २०२४ मध्ये या दोघांनीही परस्पर संमतीने वेगळे होण्याची अधिकृत घोषणा केली.

घटस्फोटानंतर नताशा आपल्या मुलावर आणि फिटनेसवर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. ती अनेकदा चाहत्यांसाठी मुलासोबतचे फोटो शेअर करते.

हार्दिकशी लग्न केल्यानंतर नताशा इंटस्ट्रीपासून दूर गेली होती. पण, घटस्फोटानंतर नताशाने पुन्हा इंडस्ट्रीत कमबॅक केलं आहे.