Red Alert! मौनी रॉय लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, रेड ड्रेसमधील फोटोंमुळे आली चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 14:13 IST2021-03-25T14:13:04+5:302021-03-25T14:13:04+5:30

अभिनेत्री मौनी रॉयने नुकतेच सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. मौनी रॉय नेहमी सोशल मीडियावरील ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटोंमुळे चर्चेत येत असते.
या फोटोत मौनी रॉय रेड कलरच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
मौनी रॉय सोशल मीडियावर ट्रेडिशनल लूक तर कधी ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.
मौनी रॉय एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
तिने कॉलेजच्या दिवसात कोरियोग्राफर म्हणून काम केले होते.
मौनी रॉय टेलिव्हिजन जगतात नागिन मालिकेतील शिवन्या आणि देवों के देव महादेवमधील सतीच्या भूमिकेतून घराघरात पोहचली आहे.
मौनी रॉयने तिच्या करिअरची सुरूवात २००७ साली एकता कपूरची मालिका क्योंकी सास भी कभी बहू थीमधून केली होती.
मौनी रॉयचे सोशल मीडिया इंस्टाग्रामवर १६.४ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.