संजय दत्तचा चावा घेतल्याने मरुन पडत होत्या मच्छर, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्यानेच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 18:30 IST2024-04-18T18:23:38+5:302024-04-18T18:30:42+5:30
Sanjay Dutt : संजय दत्तला चावा घेतल्यानंतर मच्छरांना उडताही यायचे नाही आणि ते मरून पडायचे. असे का, ते जाणून घ्या

बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्तच्या आयुष्यात अनेक चढउतार आले आहेत. एकेकाळी तो ड्रग्सच्या आहारी गेला होता. या वाईट व्यसनामुळे तो विषारी बनला होता.
संजय दत्तने कलर्स वाहिनीच्या शोमध्ये एंटरटेन्मेंट की रातमध्ये खुलासा केला होता की, एक काळ असा होता जेव्हा त्याला मच्छर चावली की ती मरून पडत होती.
हे पाहून संजय दत्त खूप हैराण झाला होता. तो म्हणाला होता की, त्याचे रक्त पिऊन मच्छर उडू शकत नव्हते आणि ते मरून पडायचे.
संजय दत्त म्हणाला होता की, डॉक्टरांनी त्याला संकेत दिले होते की, त्याच्या रक्तातील विषाचे प्रमाण वाढले आहे.
संजय दत्तला देखील या गोष्टीची जाणीव झाली होती की, त्याच्यासाठी ही धोक्याची घटना आहे.
संजय दत्त म्हणाला की, त्यानंतर तो ड्रग्सच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू लागला होता.
संजय दत्तचं म्हणणं होतं की असे ड्रग्सच्या ओव्हरडोजमुळे होत होते.
मात्र जसेजसे तो ड्रग्समधून बाहेर पडू लागला तेव्हा मच्छरांचे मरणेदेखील कमी झाले होते.