OMG! लॉकडाऊनमुळे अशी झाली मीका सिंगची अवस्था, 8 महिन्यांपासून नाही काम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 10:26 AM2020-12-10T10:26:02+5:302020-12-10T10:33:43+5:30

लॉकडाऊनचा फटका बड्या बड्या सेलिब्रिटींना बसला. बॉलिवूडचा पॉप सिंगर मीका सिंग यापैकीच एक.

लॉकडाऊनचा फटका बड्या बड्या सेलिब्रिटींना बसला. बॉलिवूडचा पॉप सिंगर मीका सिंग यापैकीच एक़ गेल्या 8 महिन्यांपासून मीकाकडे कोणतेही काम नव्हते. 8 महिन्यानंतर आत्ता कुठे ‘सयोनी’ या सिनेमासाठी त्याला गायची संधी मिळाली आहे.

‘सयोनी’ या सिनेमातील ‘एक पप्पी’ हे गाणे मीकाने गायले आहे. त्याआधी लॉकडाऊनकाळात मीकाकडे कोणतेही काम नव्हते.

लॉकडाऊन आणि यामुळे उद्भवलेल्या समस्यांवर मीका बोलला. गेल्या 8 महिन्यांपासून माझ्याकडे काम नव्हते, अशी व्यथा त्याने बोलून दाखवली.

मी आणि माझ्यासकट अनेक लोक घरी बसून कंटाळले आहेत. वैतागले आहेत, असे मीका म्हणाला.

मोठ्या पडद्यावर एखाद्या रोमॅन्टिक अ‍ॅक्शन फिल्ममध्ये गाण्याची संधी मिळावी म्हणून मी उत्सुक आहेत. लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेला मी एकटा नाही. माझ्यासारखे अनेक लोक आहेत, असे त्याने सांगितले.

ही स्थिती लवकरच बदलेल आणि सर्वांचे आयुष्य पूर्वपदावर येईल,अशी मी आशा करतो, असेही तो म्हणाला.

‘सयोनी’ या सिनेमातील गाण्याबद्दल त्याने सांगितले की, एक पप्पी हे गाणे अनंतव अमन या संगीतकारांनी संगीतबद्ध केले आहे.

निर्मात्यांनी या गाण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मला ते फार आवडले नव्हते. पण मी ते तीनचारदा गुणगुणले आणि मला ते मजेदार वाटले. या गाण्यात काही द्विअर्थी शब्दही आहेत.

मीका अलीकडे कंगना राणौतसोबतच्या वादामुळे चर्चेत आला होता. सोशल मीडियावर त्याने कंगनाचा चांगलाच क्लास घेतला होता.

‘सयोनी’ या सिनेमाबद्दल सांगायचे तर या आगामी सिनेमात तन्मय सिंह, मुस्कान सेठी, राहुल रॉय, योगराज सिंग, उपासना सिंग मुख्य भूमिकेत आहेत.