खोल समुद्रात अभिनेत्रीची स्टंटबाजी, अंडरवॉटर फोटोशूटमुळे चर्चेत आली मनस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 17:32 IST2021-02-15T17:23:48+5:302021-02-15T17:32:44+5:30

मनस्वी ममगई ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि सुपर मॉडेल म्हणून ओळखली जाते.

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मनस्वी ममगई सध्या जाम चर्चेत आहे. कारण काय तर तिचे अंडर वॉटर फोटोशूट.

होय, या फोटोत मनस्वी खोल समुद्रात शार्कसोबत मैत्री करताना, त्यांना भरवताना दिसतेय.

समुद्रातील मनस्वीचे हे फोटोशूट पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत.

मनस्वीने अजय देवगणसोबत ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’ सिनेमातून डेब्यू केला होता.

या सिनेमात तिने एक ग्लॅमरस आयटम नंबर केले होते. या गाण्यातील मनस्वीचा हॉट अंदाज पाहून सगळेच थक्क झाले होते.

अभिनेत्री बनण्याआधी मनस्वी सुपर मॉडेल होती.

2006 मध्ये तिने एलीट मॉडेल लूक इंडिया, 2008 मध्ये मिस टुरिज्म इंटरनॅशनल आणि 2010 साली फेमिना मिस इंडिया वर्ल्डचा किताब जिंकला होता.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात मनस्वीने परफॉर्म केले होते.