Malaika Arora : "नवऱ्याचं आडनाव वापरा पण तुमचं स्वतःचं बँक अकाऊंट काढा"; मलायकाचा महिलांना खास सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 14:50 IST2024-12-24T14:31:02+5:302024-12-24T14:50:34+5:30

Malaika Arora : मलायका अरोराने लग्नाबाबत महिलांसाठी एक स्ट्राँग मेसेज शेअर केला आहे.

मलायका अरोरा तिच्या ग्लॅमरस स्टाइलसोबतच बोल्ड पर्सनॅलिटीसाठी ओळखली जाते. ती नेहमीच आपलं मत उघडपणे, मोकळेपणाने मांडते.

आता मलायकाने लग्नाबाबत महिलांसाठी एक स्ट्राँग मेसेज शेअर केला आहे. अभिनेत्रीने महिलांना लग्नानंतर आपली ओळख कायम ठेवण्याचे आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहण्याचं आवाहन केलं आहे.

कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत मलायका अरोरा म्हणाली, "स्वत:ला स्वतंत्र ठेवा. जे तुझं आहे ते तुझं आहे आणि जे माझं आहे ते माझंच आहे."

"म्हणजे, जेव्हा तुम्ही लग्न करता किंवा एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्ही त्याच्याशी जुळवून घेता. तुम्हाला सर्वकाही एक असावं असं वाटतं. पण स्वतःची ओळख असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं".

लग्न हे दोन व्यक्तींचं मिलन असलं तरी महिलांनी आपली ओळख टिकवून ठेवणं आणि पैशांच्या बाबतीत कोणावरही अवलंबून न राहणं महत्त्वाचं आहे, असं मलायकाने सांगितलं.

मलायका पुढे म्हणाली, "लोक एकत्र काम करतात ही चांगली गोष्ट आहे, पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही तुमची संपूर्ण ओळख सोडून दुसऱ्याची ओळख आपल्यासाठी वापरावी."

"लग्नानंतर महिला आपल्या जोडीदाराचं आडनाव स्वतःच्या नावापुढे जोडतात. अशा परिस्थितीत किमान स्वत:चं एक तरी बँक अकाऊंट काढा."

मलायका अरोराचं अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झालं आहे. सध्या मलायका सिंगल आहे. मलायका सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.

अभिनेत्रीचे असंख्य चाहते आहेत. तिच्या फिटनेसचं नेहमीच सर्वजण कौतुक करतात. मलायका अरोरा सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.