लता मंगेशकरांना 'या' गोष्टीवर होतं विशेष प्रेम, पहिल्या पगारातून खरेदी केली होती रिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 09:09 PM2022-02-07T21:09:59+5:302022-02-07T21:16:15+5:30

लता दीदींबाबतच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी आतापर्यंत समोर आल्या असतील. पण त्यांच्या एक आवडीची आणि खास गोष्ट त्यांनी एका मुलाखतीत कथन केली होती.

भारतरत्न लता मंगेशकर यांचं काल सकाळी मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं आणि देशानं स्वर्गीय सूर असलेला अमृत आवाज गमावला. लता दीदी आज जरी आपल्यात नसल्या तरी त्यांची गाणी, आवाज आणि आठवणी नेहमी सोबत राहतील याच काहीच शंका नाही.

लता मंगेशकरांबाबत आपण आतापर्यंत अनेक गोष्टी वाचल्या आहेत. पण त्यांच्याबाबत जितकं जाणून घ्यावं तितकं कमीच आहे. लता मंगेशकरांच्या आवडी आणि निवडीची चाहत्यांना पुरेपूर कल्पना असेलच. पण त्यांच्याबाबत आणखी काही अशा गोष्टी आहेत की ज्याबाबत खूप कमी लोकांना माहित आहे.

लता मंगेशकर या एक स्वत:वर आत्मविश्वास ठेवणाऱ्या आणि आपल्या कामावर प्रचंड विश्वास ठेवणाऱ्या गायिका होत्या. इंडस्ट्रीमध्ये पुढे जाण्यासाठी त्यांनी इतर कुणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत:च्या कामावरच विश्वास ठेवणं अधिक पसंत केलं. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक उतार-चढाव पाहिले आहेत.

लता मंगेशकर या एक स्वत:वर आत्मविश्वास ठेवणाऱ्या आणि आपल्या कामावर प्रचंड विश्वास ठेवणाऱ्या गायिका होत्या. इंडस्ट्रीमध्ये पुढे जाण्यासाठी त्यांनी इतर कुणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत:च्या कामावरच विश्वास ठेवणं अधिक पसंत केलं. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक उतार-चढाव पाहिले आहेत.

घरी आर्थिक चणचण होती पण दीदींनी खूप मोठं काहीतरी खुणावत होतं आणि त्यांनी प्रचंड मेहनत घ्यायचं मनाशी पक्कं केलं होतं. त्यामुळे त्यांनी कधीच स्वप्नं पाहणं बंद केलं नाही. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या लता दीदींना डायमंडचं खूप आकर्षण होतं.

काही वर्षांपूर्वी 'द टेलिग्राफ'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतचा उल्लेख केला होता. लहानपणापासूनच डायमंड आणि हिऱ्यांची प्रचंड आवड होती असं लतादीदी म्हणाल्या होत्या.

डायमंडवर होतं विशेष प्रेम 'द टेलिग्राफ'ला दिलल्या मुलाखतीत लता मंगेशकर यांनी काही खास गोष्टी सांगितल्या. ''मला लहानपणापासूनच हिऱ्यांची आवड आहे. मी लहान असताना माझे वडील दागिने डिझाइन करायचे. पण ते खरेदी करण्याइतकी आमची परिस्थिती नव्हती. त्यांना दागिन्यांची चांगली पारख होती आणि मौल्यवान खडे परिधान करण्याची आवड देखील होती. पण जोवर मी पार्श्वगायिका होत नाही. तोवर मी दागिने परिधान करण्यास नकार दिला होता", असं लता मंगेशकर म्हणाल्या होत्या.

"मी फक्त हिऱ्याची अंगठी घालेन असं मी ठरवलं होतं. त्यामुळे पार्श्वगायिका म्हणून मला जेव्हा पहिलं मानधन मिळालं तेव्हा त्यातून मी आईसाठी एक दागिना आणि स्वत:साठी हिऱ्याची अंगठी घेतली होती", असं लता मंगेशकर यांनी सांगितलं होतं.

"पहिल्या मानधनातून घेतलेली हिऱ्याची अंगठी माझ्यासाठी खूप खास आणि मौल्यवान राहिली आहे. ती रुबी आणि हिऱ्याची अंगठी होती. ज्यावर LM असं लिहिलं होतं", असंही त्या म्हणाल्या होत्या.