'क्रिश'मधला घाऱ्या डोळ्यांचा छोटा हृतिक आठवतोय का? बॉलिवूड सोडून झाला MBBS, आता ओळखूच येणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:33 IST2026-03-11T17:10:40+5:302026-03-11T17:33:33+5:30
'क्रिश' सिनेमात छोट्या हृतिकची भूमिका बालकलाकार मिकी धमेजानी याने साकारली होती. आता तो मोठा झाला आहे.

२००६ मध्ये आलेला हृतिक रोशनचा 'क्रिश' सिनेमा सुपरहिट ठरला होता. त्यातल्या जादूने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. तर या सिनेमातील छोटा हृतिकही प्रेक्षकांना भावला होता.

या सिनेमात छोट्या हृतिकची भूमिका बालकलाकार मिकी धमेजानी याने साकारली होती. आता तो मोठा झाला आहे.

मिकीने बालपणापासून अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. घरवाली उपरवाली या मालिकेत तो दिसला होता.

'क्रिश'शिवाय त्याने इश्क विश्क, इट प्रे लव्ह या सिनेमांमध्येही काम केलं होतं. मात्र त्यानंतर तो कुठेच दिसला नाही.

प्रसिद्धी मिळूनही आणि चांगलं करिअर घडत असतानाच मिकीने बॉलिवूडला टाटा बाय बाय केलं. आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं.

मिकी आता डॉक्टर झाला आहे. त्याने MBBS पर्यंतचं शिक्षण घेतलं असून तो डोळ्यांचा डॉक्टर आहे.

मिकी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतो. अनेक रील्स तो शेअर करत असतो. या रील्समधून तो चाहत्यांना डोळ्यांबाबत माहिती देत असतो.

पण, मिकीचा चेहरा आता थोडा बदलला आहे. घाऱ्या डोळ्यांनी लक्ष वेधून घेणारा मिकी आता खूपच हँडसम दिसतो.

















