तुम्ही कधीही पाहिले नसतील कियाराचे इतके गोड फोटो...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 16:53 IST2020-05-08T16:36:19+5:302020-05-08T16:53:13+5:30
बोल्ड, ब्युटिफुल कियारा

अभिनेत्री कियारा अडवाणीने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
तिचा पहिलाच डेब्यू सिनेमा फ्लॉप झाला. पण कियाराने हार मानली नाही.
पुढे ‘एम एस धोनी: द अन्टोल्ड स्टोरी’ हा सिनेमा मिळाला आणि कियारा पहिल्यांदा सर्वांच्या नजरेत भरली.
तिचा गोड चेहरा, तितकेच गोड हास्य प्रेक्षकांना भावले.
‘लस्ट स्टोरीज‘ ही वेबसीरिज आली आणि कियारा ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली.
कबीर सिंग या चित्रपटातील कियाराची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. तूर्तास कियारा तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आहेत. होय, कियाराने काही जुने थ्रो बॅक फोटो व्हायरल होत आहेत.
कियारा आडवाणीचे खरे नाव कियारा नसून आलिया आहे.
इंडस्ट्रीत येण्याआधी तिने हे नाव बदलले़ अर्थात सलमान खानने दिलेल्या सल्ल्यानुसार. कारण कियारा बॉलिवूडमध्ये येण्याआधी आलिया भट नावाची अभिनेत्री इथे होती.
सध्या ‘लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटात बिझी आहे.
यात ती अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.