अवघ्या १८ वर्षांच्या चिअरगर्लला डेट करतोय कार्तिक आर्यन; अभिनेत्याचं जिच्यासोबत नाव जोडलं 'ती' आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:05 IST2026-01-06T15:46:29+5:302026-01-06T16:05:39+5:30
कार्तिकचे गोवा वेकेशनचे फोटो आज व्हायरल झाले. यासोबत कार्तिक जिला डेट करतोय अशी चर्चा आहे, तिचेही फोटो व्हायरल झाले. कोण आहे ती?

बॉलिवूडचा 'हँडसम हंक' कार्तिक आर्यन नेहमीच त्याच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. नुकतीच कार्तिकच्या नव्या गर्लफ्रेंडची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

कार्तिकचे गोवा वेकेशनचे फोटो आज व्हायरल झाले. यासोबत कार्तिक जिला डेट करतोय अशी चर्चा आहे, तिचेही फोटो व्हायरल झाले. त्यामुळे दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली.

कार्तिक आर्यनचं नाव जिच्यासोबत जोडलं जातंय ती आहे तरी कोण? कार्तिकच्या रुमर्ड गर्लफ्रेंडचं नाव आहे करीना कुबिलियूट.

कार्तिक आर्यन हा एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे जो करीना कुबिलीयूटला फॉलो करायचा. त्यामुळे दोघांच्या रिलेशनशिपची दाट शक्यता आहे.

करीना कुबिलीयुट ही एक व्यावसायिक चीअरलीडर आहे. लंडनमध्ये एका फुटबॉल मॅचदरम्यान कार्तिक आणि तिची भेट झाल्याची चर्चा आहे.

कार्तिक आर्यन नुकताच त्याच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये होता. तिथे तो फुटबॉल मॅच पाहण्यासाठी गेला असता त्याच्यासोबत करीना कुबिलीयुट दिसल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

कार्तिक सध्या सिंगल आहे की तो या १८ वर्षांच्या करीनाला डेट करत आहे, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आगामी दिवसांत कार्तिक याबद्दल खुलासा करेल अशी सर्वांना अपेक्षा आहे

















