लॉकडाउनदरम्यान घराच्या भिंतीवर पेटिंग करताना दिसला तैमूर, करीना कपूरने शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 18:14 IST2020-04-20T18:14:25+5:302020-04-20T18:14:25+5:30

लॉकडाउनमुळे सध्या करीना कपूर सैफ अली खान व तैमुरसोबत वेळ व्यतित करत आहे.
करीना तिचा मुलगा तैमूर आणि नवरा सैफ अली खानचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
करीना कपूरने नुकताच तैमूर आणि सैफ अली खानसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सैफ व तैमूर घराच्या भिंतीवर पेंटिंग करताना दिसत आहे.
सैफ अली खान व तैमूरचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
करीना कपूरने फोटो शेअर करत लिहिले की, कोणतीच भिंत तुमच्या कल्पनेला रोखून ठेवू शकत नाही.
करीनाने इंस्टाग्रामवर अकाउंट सुरू केल्यापासून फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.
तैमूर अली खान घरातील सर्वात लाडका सदस्य आहे. करीना नेहमी तैमूरसोबतचे फोटो शेअर करत असते.