PHOTOS : 'बेबो मैं बेबो…' करीना कपूर खानचा ग्लॅम लुक, फोटोवरून चाहत्यांच्या नजरा हटता हटेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 17:10 IST2024-12-08T17:05:31+5:302024-12-08T17:10:47+5:30

सध्या करीना कपूरच्या नव्या फोटोशूटची सगळीकडे चर्चा होतेय.

बॉलीवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर खान कायम चर्चेत असते.

इव्हेंट असो की पार्टी, बेबो नेहमीच आपल्या लूकने सगळ्यांना जिंकताना दिसते.

नुकतंच तिने खास फोटो शेअर केले आहेत. न्यूड मेकअप, स्मोकी आय असा लूक तिने केला.

करीनाने यावेळी पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला. तिचा लुक अगदीच आकर्षक आहे.

यावेळी करीनाने आपल्या सौंदर्याने आणि स्टायलिश लूकने सर्वांना वेड लावले आहे.

आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

प्रत्येक वेळी आपल्या किलर लूकने चाहत्यांची मनं जिंकण्यात तिचा हातखंडा आहे.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती अलिकडेच 'सिंघम अगेन' मध्ये झळकली होती. कमी स्क्रीन टाईम मिळूनही तिने आपल्या अभिनयाने चांगला प्रभाव पाडला.