"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 14:55 IST2025-08-20T14:43:12+5:302025-08-20T14:55:42+5:30
नवाब घराण्याचा जितका शर्मिला टागोर किंवा सैफ अली खानला गर्व नाही तितका करीना कपूरला असल्याचं पत्रकार अनिता पाध्ये यांनी म्हटलं आहे.

पटौडी खान हे बॉलिवूडमधील राजघराणं आहे. या नवाब घराण्याचीच अभिनेत्री करीना कपूर सून आहे.
पण, नवाब घराण्याचा जितका शर्मिला टागोर किंवा सैफ अली खानला गर्व नाही तितका करीना कपूरला असल्याचं पत्रकार अनिता पाध्ये यांनी म्हटलं आहे.
अनिता पाध्ये यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती.
या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "मी कपूर घराण्यातील अनेकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. कपूर कुटुंबामध्ये करीना थोडीशी वेगळी आहे".
"तिला थोडासा अॅटिट्यूड आहे. सैफसोबत लग्न केल्यानंतर तिला अॅटिट्यूड आला", असं त्या म्हणाल्या.
"शर्मिला टागोर, सैफ अली खान नवाब असूनही स्वत:ला नवाब समजत नाहीत. सैफ तर स्वभावाने खूप चांगला आहे".
"पण करीनामध्ये लग्नानंतर थोडासा अॅटिट्यूड आला आहे. तिची बहीण करिश्मादेखील स्वभावाने खूप चांगली आहे", असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, करीना कपूर आणि सैफ अली खानने २०१२ मध्ये लग्न करत संसार थाटला. त्यांना जेह आणि तैमुर ही दोन मुले आहेत.