कपिल शर्माचा 'फॅट टू फिट' प्रवास, वजन घटवण्यासाठी वापरलेला '२१-२१-२१' फॉर्म्युला नेमका काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:32 IST2025-11-20T17:21:12+5:302025-11-20T17:32:13+5:30

कपिल शर्मा ६३ दिवसांत फॅट टू फिट झाला. त्यानं तब्बल ११ किलो वजन कमी केलं. कपिल शर्मानं कोणता डाएट प्लॅन, वर्कआउट फॉलो केलं, असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे.

कॉमेडीचा बादशहा आणि लाखो लोकांचा लाडका कॉमेडियन कपिल शर्मा सध्या त्याच्या कॉमेडीमुळे नाही, तर त्याच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आला आहे.

कपिल शर्माचा नवीन, स्लिम आणि तंदुरुस्त लूक पाहून त्याचे चाहते आणि प्रेक्षक सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

हे काही क्रॅश डाएट किंवा अतिरेकी वर्कआउट्सचं कमाल नाही, तर फिटनेस ट्रेनरने आखून दिलेल्या एका खास जीवनशैलीचा परिणाम आहे.

कपिल शर्माने अगदी थोड्या वेळात म्हणजे फक्त ६३ दिवसांमध्ये तब्बल ११ किलो वजन कमी केले आहे.

या ट्रान्सफॉर्मेशननंतर त्याच्या लूकमध्ये लक्षणीय बदल झाला असून तो तंदुरुस्त दिसत आहे.

या जलद वजन कमी करण्यामागील रहस्य सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर योगेश भटेजा यांनी उलगडले आहे. भटेजा यांच्या मते, कपिलने एका खास नियमाचं पालन केलं. तो नियम म्हणजे '२१-२१-२१'

हा फिटनेस नियम खूप सोपा पण प्रभावी आहे, जो तीन टप्प्यांमध्ये विभागलेला आहे.

पहिले २१ दिवस - या टप्प्यात फक्त हलक्या व्यायामाने सुरुवात करावी लागते. महत्त्वाचं म्हणजे, या व्यायामाचं सातत्याने पालन करणं गरजेचं आहे.

पुढील २१ दिवस - या टप्प्यात निरोगी आहाराचे काटेकोरपणे पालन करावे लागते. या दिवसांमध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि मिठाई पूर्णपणे टाळल्या पाहिजेत.

शेवटचे २१ दिवस - हा टप्पा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण यात तुम्हाला शरीरासाठी हानिकारक सवयी सोडाव्या लागतात. यात धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या सवयींचा समावेश आहे.