जॅकलिन फर्नांडिस पोहोचली बंगळुरूच्या आश्रमात, श्री श्री रविशंकर यांच्या भेटीनंतर जॅकलिन म्हणाली "माझं हृदय कृतज्ञतेनं भरून आलंय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:50 IST2025-06-18T12:40:23+5:302025-06-18T12:50:11+5:30

शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून अभिनेत्रीनं आवर्जून आश्रमाला भेट दिली.

श्रीलंकन ब्युटी क्वीन जॅकलीन फर्नांडिस Jacqueline Fernandez) आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून जॅकलिनने तिची ओळख निर्माण केली. जॅकलिन फर्नांडिस नेहमी तिच्या चाहत्यांसाठी तिच्या आयुष्यात घडणाऱ्या अपडेट्स शेअर करत असते.

जॅकलिन सध्या बंगळुरुमधील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात (Jacqueline Fernandez Reaches Bengaluru Ashram) पोहचली आहे.

यात ती श्री श्री रविशंकर यांच्यासह दिसत आहे. तिचं हे साधं, शांत आणि आध्यात्मिक रूप सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

जॅकलिननं सोशल मीडियावर श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमातील तिचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत.

या फोटोसोबत तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, "माझं हृदय कृतज्ञतेनं भरून आलंय. मला मार्ग दाखवण्यासाठी गुरूदेव श्री श्री रविशंकर यांचे मनापासून धन्यवाद. मी तुमची ऋणी आहे", असं तिने लिहिलंय.

आश्रमात जॅकलिननं प्राण्यासोबत वेळ घालवला. तिच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत खूप कौतुक केले.

श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात दाखल झाल्यानंतर तिच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच अध्यात्मिक झलक पाहायला मिळाली आहे.

जॅकलिनच्या आधी हिना खान आणि विक्रांत मेसी सारख्या स्टार्सनीही आश्रमाला भेट दिली आहे.

जॅकलिन सध्या तिच्या 'हाऊसफुल ५' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जो ६ जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'वेलकम टू द जंगल'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात लारा दत्ता, दिशा पटानी, रवीना टंडन आणि सुनील शेट्टी सारखे स्टार दिसणार आहेत.