जॅकलिन फर्नांडिसच्या या फोटोंवर चाहते झाले फिदा, पाहा तिचा हा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 18:21 IST2021-05-27T18:21:30+5:302021-05-27T18:21:30+5:30

जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
जॅकलिन प्रिंटेड वनपीसमध्ये खूपच छान दिसत असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
जॅकलिन खूपच छान दिसत असल्याचे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.
जॅकलिन तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिच्या ग्लॅमरस अदा, बोल्ड लूक यामुळे भारतामध्ये तिचे अनेक चाहते आहेत.
जॅकलिन ही मुळची श्रीलंकेची आहे.तिने आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात २००९ मध्ये ‘अलादीन’ पासून केली होती. यात तिच्या सोबत रितेश देशमुख आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते.
त्यानंतर जॅकलिन ‘मर्डर 2’ मध्ये इमरान हाशमीसोबत दिसली होती. जॅकलिन आज बॉलिवूडवर राज्य करत आहे.
जॅकलिनकडे सध्या एकूण ४ बिग बजेट चित्रपट आहेत. यापैकी 'बच्चन पांडे' हा एक चित्रपट आहे.
रोहित शेट्टीच्या 'सर्कस'मध्ये ती रणवीर सिंगसोबत झळकणार आहे.तसेच सैफ अली खान, यामी गौतम आणि अर्जुन कपूरसोबत 'भूत पुलिस', तर सलमान खानसोबत 'किक-२'मध्येही स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय ती अक्षय कुमारसोबत रामसेतू चित्रपटातही काम करताना दिसणार आहे.