जॅकलिनचा बोल्डनेस पाहून युजर्स म्हणाले, 'सुकेश भैया जिंदाबाद…'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 00:08 IST2023-02-28T23:52:44+5:302023-03-01T00:08:49+5:30
jacqueline fernandez : जॅकलिन फर्नांडिस आपल्या फॅशन सेन्स आणि स्टाइल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने नुकतेच आपले बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जॅकलिनच्या फोटोंवर चाहत्यांच्या सतत कमेंट्स येत आहेत. तसेच, हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
जॅकलिन फर्नांडिस आपल्या फॅशन सेन्स आणि स्टाइल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती काही बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे.
या फोटोंमध्ये जॅकलिन फर्नांडिस सेक्सी गोल्डन आउटफिटमध्ये दिसून येत आहे. हे पाहून काहींनी तिला सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची आठवण करून दिली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या जॅकलिन फर्नांडिसच्या फोटोंवर कमेंट करताना एका यूजरने 'सुकेश भैया जिंदाबाद', असे लिहिले आहे. त्याचवेळी आणखी एका युजरने किती पैसे खाल्ले, असे लिहिले आहे.
या फोटोंमध्ये जॅकलिन फर्नांडिसने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा कशा ओलांडल्या आहेत, हे तुम्ही पाहू शकता. क्रॉस नेकसह जॅकलिनच्या अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत.
दरम्यान, 200 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणात जॅकलिनचे नाव सर्वात आधी आले होते. मात्र, अनेकवेळा चौकशी झाल्यानंतर या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला दिलासा मिळाला आले.