Independence Day 2023: देशभक्तीवर आधारीत हे चित्रपट पाहून साजरा करा देशाच्या ७६व्या स्वातंत्र्याचा सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 07:00 AM2023-08-15T07:00:00+5:302023-08-15T07:00:00+5:30

Independence Day 2023: यंदा भारताचा ७६वा स्वातंत्र्यदिन आहे. या निमित्ताने पाहा हे देशभक्तीवर आधारीत चित्रपट

विकी कौशलचा उरी चित्रपट २०१६ ला रिलीज झाला. हा चित्रपट उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी लॉन्च पॅडवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारित आहे.

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेमुळे हर्षालीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली होती. चुकून भारतात आलेल्या मुन्नीला पवन कशा पद्धतीने अडचणींचा सामना करत पाकिस्तानमध्ये तिच्या आईवडिलांकडे पोहोचवतो, याबद्दलची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांमध्ये कॅप्टन विक्रम बत्रा यांचाही समावेश आहे. २०२१मध्ये त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘शेरशाह’ नावाचा एक चित्रपट बनवण्यात आला होता, जो लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटात अभिनेत्री सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणी झळकली होती.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेते पंकज त्रिपाठी स्टारर ‘गुंजन सक्सेना’ हा चित्रपट देखील कारगिल युद्धावर आधारित आहे.

केसरी सिनेमा सारागडीच्या लढाईवर आधारित आहे. ही लढाई म्हणजे जगभरातील मानवी शौर्याची सर्वात प्रेरणादायी कथा मानली जाते. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.

सलमान खान आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला भारत हा चित्रपट साऊथ कोरियन ड्रामा असलेल्या ओडे टू माय फादर या चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाची कथा फ्लॅशबॅकमध्ये १९४७ साली सुरु होते. फ्लॅशबॅकमध्ये भारताची होणारी फाळणी, त्या काळातील जनतेची परिस्थिती, या सगळ्यात भारतचं खुलणारं प्रेम आणि त्याचा जीवनाशी सुरु असलेला संघर्ष दाखवण्यात आला आहे.

आलिया भटचा राझी चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. यात आलियासोबत विकी कौशलही मुख्य भूमिकेत आहे.

अक्षय कुमारचा हा आणखी एक चित्रपट जो आपल्या मनात देशप्रेमाची भावना जागृत करतो. हा चित्रपट लंडनमधील 1948 च्या ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारताच्या पहिल्या सुवर्णपदक जिंकण्याच्या सत्य घटनांपासून प्रेरित असलेल्या एक काल्पनिक कथेवर आधारित आहे.

बेबी हा चित्रपट नीरज पांडे दिग्दर्शित अ‍ॅक्शन-थ्रिलर आहे.