'हम साथ साथ है'मधली सलमान-सैफची क्यूट भाची आठवतेय? आता दिसते इतकी सुंदर, ओळखताच येणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:21 IST2026-01-21T17:14:39+5:302026-01-21T17:21:56+5:30
'हम साथ साथ है'मधील सलमान-सैफच्या छोट्या भाचीची भूमिका बालकलाकार झोया अफरोज हिने साकारली होती.

'हम साथ साथ है' हा ९०च्या दशकातील गाजलेला बॉलिवूड सिनेमा. आजही हा सिनेमा टीव्हीवर लागला की चॅनेल बदलावासा वाटत नाही.

सलमान खान, सैफ अली खान, तबू, सोनाली बेंद्रे, करिश्मा कपूर, आलोक नाथ, निलीम कोठारी अशी सिनेमाची तगडी स्टारकास्ट होती.

या सिनेमातील छोट्या कलाकारांनीही चाहत्यांची मनं जिंकून घेतली होती. 'हम साथ साथ है'मधील सलमान-सैफच्या छोट्या भाचीची भूमिका बालकलाकार झोया अफरोज हिने साकारली होती.

झोयाने तिच्या क्यूटनेसने चाहत्यांनी मनं जिंकून घेतली होती. आता झोया बरीच मोठी झाली आहे. इतकी की तिला ओळखणंही कठीण जात आहे.

३ वर्षांची असल्यापासूनच झोयाने इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती. कोरा कागज या मालिकेने तिला मोठा ब्रेक मिळवून दिला.

'हम साथ साथ है', 'मन', 'कुछ कहो ना' या सिनेमांमध्ये तिने बालकलाकार म्हणून काम केलं होतं.

झोया एक मॉडेलदेखील आहे. १८व्या वर्षी तिने फेमिना मिस इंदौर २०१३ हा खिताब जिंकला होता. मिस इंडिया इंटरनॅशनल २०२१ची ती विजेती होती.

२०२४ मध्ये 'सिकंदर का मुकद्दर' या सिनेमात झोया दिसली होती. तर नुकतंच तिची 'तस्करी' ही वेब सीरिज रिलीज झाली आहे. ज्यामध्ये इमरान हाशमी मुख्य भूमिकेत आहे.

















