हृतिक रोशनने अमिशा पटेलसोबत 'कहो ना प्यार है'साठी केलेलं फोटोशूट, २५ वर्षांपूर्वींचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 19:04 IST2025-01-07T17:42:20+5:302025-01-07T19:04:27+5:30

'कहो ना प्यार है' सिनेमासाठी २५ वर्षांपूर्वी हृतिक-अमिशाने केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे (kaho na payaar hai, hrithik roshan, amisha patel)

'कहो ना प्यार है' सिनेमा पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमानिमित्त हृतिक रोशन आणि अमिशा पटेल यांनी २५ वर्षांपूर्वी केलेलं फोटोशूट व्हायरल झालंय

'कहो ना प्यार है'साठी हृतिक रोशन आणि अमिशा पटेल यांनी रोमँटिक अंदाजात फोटोशूट केलेलं जे चर्चेत होतं.

'कहो ना प्यार है' हा हृतिक आणि अमिशा दोघांचाही पहिला सिनेमा होता. या सिनेमासाठी हृतिक-अमिशाने खास फोटोशूट केलेलं

२००० साली 'कहो ना प्यार है' रिलीज झालेला. त्यावेळी नवखे कलाकार असूनही हृतिक - अमिशा यांनी आत्मविश्वासाने एकमेकांसोबत स्क्रीन शेअर केली

'कहो ना प्यार है' सुपरहिट झाला. परिणामी सिनेमा रिलीज होऊन २५ वर्ष झाले असले तरीही हृतिक-अमिशाची जोडी आजही प्रेक्षकांची फेव्हरेट आहे

'कहो ना प्यार है' २५ वर्षांनंतर थिएटरमध्ये पुन्हा रिलीज होतोय. १० जानेवारी २०२५ ला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे

'कहो ना प्यार है' पुन्हा २५ वर्षांनंतर रिलीज होत असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला आहे. हृतिक-अमिशाला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बघायला त्यांचे चाहते उत्सुक आहेत