कोरोना काळात देवदूत ठरलेल्या सोनू सूदच्या आलिशान घराचे फोटो पाहिलेत का?, पहा घरातील Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 01:18 PM2021-05-28T13:18:36+5:302021-05-28T13:36:02+5:30

अभिनेता सोनू सूद कोरोनाच्या संकटात अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. सोनू मुंबईतील अंधेरी या परिसरात राहातो.

सोनू सूद याचं घर हे वास्तुशास्त्राच्या अनुशंगाने डिझाईन करण्यात आलं आहे.

सोनूसोबत त्याची पत्नी सोनाली आणि दोन मुलं या अलिशान घरात राहातात.

सोनू सूदने घरात प्रत्येक सदस्याच्या आवडीनिवडी प्रमाणे गोष्टी करण्यात आल्या आहेत.

कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला सोनूने हे घर खरेदी केल्याचे सांगितले जाते.

बऱ्याच वर्षांपासून तो या घरात राहत आहे.

सोनू सूदच्या 2600 चौरस फुटांच्या या घरात 4 बेडरुम आहेत.

सोनू सूदच्या घरातील हा डायनिंग एरिया आहे. डायनिंग टेबलवर क्रिस्टलचे छान झुंबर लावले आहे.

डायनिंग एरियाच्या बाजूलाच शांत आणि सुखद वाटावे यासाठी भिंतीवर ओम लावण्यात आला आहे.

सोनू सूदच्या मुलांना फुटबॉल खेळ खूप आवडतो. तर त्याने वॉर्डरॉबच्या डोअरवर फुटबॉल प्लेअर ख्रिस्तिनो रेनाल्डोचा फोटो वापरला आहे.

घर ही एक अशी वास्तू आहे, ज्याहून अधिक शांतता कुठेच मिळत नाही असं सोनूचं ठाम मत आहे.